महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे - मंत्री अशोक चव्हाण - congress breaking news

खासदार राहुल गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत. सर्वसामान्यांच्या व्यथांना त्यांनी नेहमीच अत्यंत दूरदर्शीपणे व नेमकी वाचा फोडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांनीच करावे, ही आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

ashok chavan
अशोक चव्हाण

By

Published : Aug 24, 2020, 4:18 PM IST

नांदेड - खासदार राहुल गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत. सर्वसामान्यांच्या व्यथांना त्यांनी नेहमीच अत्यंत दूरदर्शीपणे व नेमकी वाचा फोडली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर व्यापक देशहिताची भूमिका परखडपणे मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांनीच करावे, ही आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

समाज माध्यमावर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, भारताची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू-गांधी कुटुंबाने दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटित ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या सक्रिय नेतृत्वाची गरज आहे. पक्षाला एकजीव ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे. इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे. पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल. पण, खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. राहुल गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत. सर्वसामान्यांच्या व्यथांना त्यांनी नेहमीच अत्यंत दूरदर्शीपणे व नेमकी वाचा फोडली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर व्यापक देशहिताची भूमिका परखडपणे मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांनी करावे, ही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-1 आणि युपीए-2 च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता केवळ कर्तव्यभावनेतून त्यांनी देश व काँग्रेसची सेवा केली. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत त्या योग्य व सर्वमान्य निर्णय घेतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. असे चव्हाण म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details