नांदेड : राहुल गांधी यांची भारत जोडो ( Rahul Gandhi in bharat jodo yatra ) यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नांदेडमधील कॉर्नर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Rahul Gandhi attacks on Narendra modi ) यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले, एअरबसचा प्रकल्पही असाच गुजरातमध्ये अचानक गेला. कसा गेला? हे कोणालाही कळले नाही. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्पही गेला. लाखो कोटी रुपयांची गुंतवणुकही गेली व महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.
रस्त्यावरून चालताना राज्याची अवस्था कळते - राहुलजी गांधी पुढे म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी ही पदयात्रा सुरू केली आणि आज महाराष्ट्रात आली आहे. उन्हा-तान्हात तुम्ही मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. दिवसभर 7-8 तास दररोज चालतो. शेतकरी, तरुण, महिला, यांच्या समस्या ऐकून घेतो. मला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. रस्त्यावरून चालणे व गाडीतून चालणे यात फरक आहे. संपूर्ण भारत समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावर चालले पाहिजे. रस्ते कसे आहेत ते आधी कळते, राज्याची अवस्था रस्त्यावरून कळते.
नोटबंदीचा परिणाम आता जाणवत आहे - शेतकरी, तरुण, यांच्याकडून ऐकतो तेव्हा वाईट वाटते. 6 वर्षापूर्वी नोटबंदी केली त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. नोटाबंदी व जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्सुनामी आली. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली. सरकारी उद्योग खाजगी उद्योगपतींना विकले जात आहेत. सरकारी नोक-या नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे.