नांदेड - कंधार येथील रहिवासी असलेला तरुण दहा दिवसांपूर्वी पुण्याहून आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने नांदेडला हलविले असता त्याचा विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. युवकाचा मृत्यू झाल्याच्या या घटनेला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला असला तरी मृत्यूचे नेमके कारण काय आहे? हे स्वॅब अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे.
कंधार येथील रहिवासी असलेला तरुण कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होता, मुंबई व पुणे येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने तरुणाने काही दिवसांपूर्वी गाव गाठले होते. दरम्यान, बाहेरगावाहून आलेल्यांची तपासणी करुन कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जात आहे.