नांदेड- जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने राज्यात देखील पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील नागरिकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे मत राज्याचे सावर्जनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. जनता कर्फ्यूनंतर ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरले ते चुकीचे आहे. कारण आपली एक चूक मोठा धोका निर्माण करू शकते, असेही चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले. ते नांदेडमध्ये बोलत होते.
COVID-19 : 'आपली एक चूक खूप मोठा धोका निर्माण करू शकते' - कोरोना बाधित
जमावबंदी आदेश असतानाही लोक चारचाकी-दुचाकी घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. केवळ रविवार पुरताच हा विषय मर्यादित नसून आता कुठे आपली लढाई सुरू झाली आहे. आपण जर काळजी घेतली नाही तर आपल्याला व राज्याला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे कृपाकरून घराबाहेर पडू नका, असे आवाहनही चव्हाणांनी यावेळी केली.
चव्हाण म्हणाले, जमावबंदी आदेश असतानाही लोक चारचाकी-दुचाकी घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. केवळ रविवार पुरताच हा विषय मर्यादित नसून आता कुठे आपली लढाई सुरू झाली आहे. आपण जर काळजी घेतली नाही तर आपल्याला व राज्याला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे कृपाकरून घराबाहेर पडू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या आदेशाचे सुचनांचे पालन होणे आवश्यक आहे. जमावबंदीचा आदेश धुडकावून नागरिक काल सायंकाळपासून ज्या पद्धतीने रस्त्यावर येत आहेत, ते अत्यंत चिंताजनक आहे. कोरोनाविरूद्धची लढाई अजून संपलेली नाही. तर ती आता खऱ्या अर्थाने सुरू झालीय. त्यामुळे शासनाचे निर्देश पाळावेत आणि प्रवास व गर्दी करू नये. आपली जी काही कामे असतील ती मोबाईल किंवा फोनवरून करा. मीच माझा रक्षक समजून काळजी घ्यावी असे आवाहन चव्हाण यांनी यावेळो केले.