नांदेड- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पाल्यांना दत्तक घेण्याचा निर्णय पुरुषोत्तम धोंडगे यांनी घेतला आहे. कोरोना काळात घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेकांपुढे मुलांच्या संगोपणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. मात्र पुरुषोत्तम धोंडगे यांच्या उपक्रमामुळे छत्रछाया हरवलेल्या मुलांना आधार मिळणार आहे.
भाई केशव धोंडगे यांच्या जन्म शताब्दी निमित्त विविध उपक्रम-
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसेनानी भाई डॉ. केशवराव धोंडगे यांच्या जन्म शताब्दी निमित्त विविध उपक्रम घेतले जात आहेत. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी ही माहिती दिली. कोविड लसीकरण घेतलेले राज्यात सर्वात जास्त वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून भाई धोंडगे यांनी ऐतिहासिक नोंद झाली आहे. राज्याच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ विधिमंडळ सदस्य म्हणून भाई केशवराव धोंडगे यांची ओळख आहे. त्यांचं वय १०२ वर्ष आहे. १९५७ पासून ते १९९५ पर्यंत ते विधिमंडळ सदस्य होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीती पूर्वी विधिमंडळाचे भाई धोंडगे सदस्य ( १९५७) होते आता. समकालीन मोजकेच माजी सदस्य असावेत. या काळात त्यांना खासदार म्हणून निवडून आले आहेत. राज्याच्या ११ मुख्यमंत्र्यासोबत काम करणारे ते राज्यातील एकमेव माजी आमदार आहेत. त्यांच्या जन्म शताब्दी निमित्त कोरोना रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवले जातात आहेत.