महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात चार खरेदी केंद्रावर 26 हजार क्विंटल कापूस खरेदी - नांदेड कापूस बातमी

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी कापूस खरेदी होत आहे. नांदेड जिल्ह्यात दोन खरेदी केंद्रांव चार कॉटन मिलवर सध्या 26 हजार 94 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

वाहने
वाहने

By

Published : Dec 5, 2020, 8:32 PM IST

नांदेड -महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी (सीसीआय) कापूस खरेदी होत आहे. जिल्ह्यात पणनकडून भोकर व तामसा (ता. हदगाव) या दोन खरेदी केंद्रांवर चार कॉटन मिलवर सध्या 26 हजार 61 क्विंटल कापसाची खरेदी झाली, अशी माहिती पणनच्या विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात सीसीआयकडून दोन ठिकणांहून कापूस खरेदी....!

जिल्ह्यात सध्या 'सीसीआय'साठी दोन यंत्रणांकडून कापूस खरेदी सुरू आहे. यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून भोकर येथील मंजित कॉटन व व्यंकटेश्वरा जिनींग या दोन ठिकाणी खरेदी सुरू आहे. या ठिकाणी 21 हजार 711 क्विंटल कापसाची खरेदी झाली.

कोणत्याही ठिकाणी कटी घेतली जात नाही

तर, तामसा (ता. हदगाव) येथील बालाजी कॉटनस्पीन व नटराज कॉटन प्रायवेट लिमिटेड या दोन ठिकाणी 4 हजार 350 क्विंटल अशा एकूण 26 हजार 61 क्विंटल कापसाची खरेदी झाली. खरेदी केंद्रांवर केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार खरेदी होत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कटी घेतली जात नाही. नियमानुसार आर्द्रता तपासली जात असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दाभड व कलदगाव (ता. अर्धापूर) व नायगाव येथे खरेदी सुरू आहे. या दोन केंद्रांवर 13 हजार 332 क्विंटल कपाशीची खरेदी झाली.

हेही वाचा -शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नांदेडमध्ये 'स्वाभिमानी'चे 'रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन'

ABOUT THE AUTHOR

...view details