नांदेड - संचखंड गुरुव्दारात दर्शनासाठी आलेल्या पंजाब, हरियाणा व दिल्ली येथील भाविक लॉकडाऊनमुळे दीड महिन्यापासून अडकून पडले होते. मात्र, आता यात्रेकरूंना घेऊन जाण्यासाठी पंजाब सरकारने खास व्यवस्था केली आहे. पंजाब सरकारकडून 80 ट्रॅव्हल्स नांदेडमध्ये सोमवारी (दि. 27 रोजी) नांदेड येथे दाखल झाल्या. जवळपास अडीच हजार यात्रेकरू पंजाबकडे सायंकाळी रवाना होणार आहेत.
नांदेडमध्ये अडकलेले भाविक परतणार; पंजाब सरकारच्या ८० बसेस दाखल - sikh pilgrimes in nanded
संचखंड गुरुव्दारात दर्शनासाठी आलेल्या पंजाब, हरियाणा व दिल्ली येथील भाविक लॉकडाऊनमुळे दीड महिन्यापासून अडकून पडले होते. मात्र, आता यात्रेकरूंना घेऊन जाण्यासाठी पंजाब सरकारने खास व्यवस्था केली आहे.
कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व प्रकारच्या वाहतुकीवर निर्बंध आले. जिल्ह्यात गुरू गोविंदसिंगजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. मार्च महिन्यात होली मोहल्ला या कार्यक्रमासाठी लाखो भाविक विविध राज्यातून, परदेशातून नांदेडमध्ये आले होते. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांपासून 3 ते 4 हजार भाविक जिल्ह्यात अडकून पडले. त्यांना स्वगृही पाठवण्यासाठी राज्य सरकारने खासगी वाहनांची व्यवस्था केली आहे. याआधी जवळपास ९०० भाविकांना पंजाबमध्ये पाठवण्यात आले असून आणखी ८० वाहनांची कुमक रवाना करण्यात आली आहे. आज सांयकाळी सर्व भाविक आपापल्या प्रांतात रवाना होतील. यासाठी गुरुद्वारा बोर्ड आणि लंगरसाहेब यांनी पुढाकार घेतला आहे.
यातील प्रत्येक एका गाडीसोबत तीन चालक तसेच सर्व गाड्यांवर दोन उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी पंजाब सरकारने सोबत दिले आहेत.