नांदेड - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पिकेल ते विकेल या उपक्रमा अंतर्गत संत सावता माळी रयत बाजारासाठी जवळपास 60 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत असून या बाजाराकडे ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. जवळपास दररोज 25 ते 30 लाखाच्या आसपास उलाढाल या बाजाराच्या माध्यामातून होत असून ही एकूण दीड कोटीपर्यंत पोहोचेल असे अपेक्षित आहे.
नांदेडच्या रयत बाजाराला उत्तम प्रतिसाद; दीड कोटींच्या उलाढालीची अपेक्षा...! - संत सावता माळी रयत बाजार
नांदेड येथे संत सावता माळी रयत बाजारासाठी जवळपास 60 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत असून या बाजाराकडे ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.
नांदेडच्या रयत बाजाराला उत्तम प्रतिसाद
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान हे अत्यंत दिशादर्शक आहे. ज्याची मागणी आहे ते आपल्या शेतात पिकवून बाजारपेठेत त्या शेतमालाच्या विक्रीचे कसब शेतकऱ्यांनी अंगीकारल्यास निश्चितच अधिकचा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.