नांदेड - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राहत असलेल्या शिवाजीनगर प्रभागात दूषित पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. याच समस्येसाठी नागरिकांनी आज आमदार डी. पी सावंत यांच्या घरावर मोर्चा काढला.
अशोक चव्हाण यांच्या प्रभागातच दूषित पाणीपुरवठा; नागरिकांचा काँग्रेस आमदाराच्या घरावर मोर्चा - sawant
अशोक चव्हाण यांच्या शिवाजी नगर या प्रभागात चारही नगरसेवक काँग्रेसचे आहेत. महापालिकेत देखील बहुमताने काँग्रेसची सत्ता आहे. तरीही चव्हाण यांच्या स्वतः च्याच प्रभागात लोकांना आंदोलन करावे लागत आहे.
नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात अशोक चव्हाण यांचे निवासस्थान आहे. याच शिवाजीनगर भागात मागील अनेक महिन्यांपासून नळाला ड्रेनेजयुक्त पाणी येत आहे. याबाबतीत स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र, प्रश्न न सुटल्याने या भागातील संतप्त नागरिकांनी थेट अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला. अशोक चव्हाण घरी नसल्याने नागरिकांनी शेजारीच राहत असलेल्या आमदार डी. पी. सावंत यांच्या घराकडे मोर्चा वळवला. दूषित पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली. अन्यथा येत्या लोकसभा निवडणुकित बहिष्कार घालण्याचा इशारा देखील नागरिकांनी यावेळी दिला.
अशोक चव्हाण यांच्या शिवाजी नगर या प्रभागात चारही नगरसेवक काँग्रेसचे आहेत. महापालिकेत देखील बहुमताने काँग्रेसची सत्ता आहे. तरीही चव्हाण यांच्या स्वतः च्याच प्रभागात लोकांना आंदोलन करावे लागत आहे.