नांदेड -खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला शहरातून अटक करण्यात आले. 'खलिस्तान जिंदाबाद' संघटनेचा सदस्य असलेला सरबजीतसिंग किरट याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने रविवारी अटक केले.
खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा आहे सदस्य -

सरबजीतसिंग किरट हा खलिस्तान जिंदाबाद या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. बेल्जियममधील खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेच्या तो संपर्कात होता. त्या ठिकाणाहून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात होते.
हिंदू संघटनेचे नेते होते रडारवर -
खलिस्तानचा विरोध करणारे हिंदू संघटनेचे नेते त्याच्या रडारवर होते. सरबजीतसिंग नांदेडमध्ये लपला असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पंजाब पोलिसांचे सीआयडी पथक आणि नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिकारघाट परिसरातून दहशतवादी सरबजीतसिंगला अटक केली.