महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हळदीची आवक वाढली, ...गैरफायदा घेऊन व्यापाऱ्यांनी पाडले दर - हळदीची आवक वाढली

आजपासून लॉकडाऊन खुले झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात हळदीची आवक झाली आणि व्यापाऱ्यांनी याचाच गैरफायदा घेत हळदीची कमी दराने खरेदी केले. दोन दिवसांपूर्वी सहा ते साडे हजार प्रतिक्विंटल दर असणारी हळद आज चक्क चार ते पाच हजाराने विक्री होत होती.

prize-of-turmeric-was-down-traders-take-advantage
हळदीची आवक वाढली, ...गैरफायदा घेऊन व्यापाऱ्यांनी पाडले दर

By

Published : Apr 20, 2020, 3:11 PM IST

Updated : Apr 20, 2020, 3:27 PM IST

नांदेड- शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात दररोजच्या तुलनेत मालाची आवक सुरू झाली असून खरेदी विक्रीही सुरू झाली आहे. हळदीसह, तूर, गहू, हरभऱ्यासह ज्वारीची आवक सुरू आहे. आजपासून लॉकडाऊन खुले झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात हळदीची आवक झाली आणि व्यापाऱ्यांनी याचाच गैरफायदा घेत हळदीची कमी दराने खरेदी केली. दोन दिवसांपूर्वी सहा ते साडे हजार प्रतिक्विंटल दर असणारी हळद आज चक्क चार ते पाच हजाराने विक्री होत होती. दीड ते दोन हजाराचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच ज्वारी, गहू व हरभऱ्याच्या बाबतीतही हीच स्थिती होती. माल विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

हळदीची आवक वाढली, ...गैरफायदा घेऊन व्यापाऱ्यांनी पाडले दर

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे शेतीमालाच्या खरेदी-विक्रीवर याचा मोठा परिणाम झाला. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे शेतीमालाच्या खरेदी-विक्रीला चालना मिळून शेतकऱ्यांना दोन पैसे फायदा होईल अशी अपेक्षा होती. पण लॉकडाऊन खुले केल्यानंतर पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात हळदीची मोठी आवक लक्ष्यात घेता याचा गैरफायदा घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. दीड ते दोन हजार रुपये कमी दराने हळदीचे बिट झाले. बाजार खुले होऊनही आमच्या मागची साडेसाती कायम आहे,अशी भावना शेतकरी व्यक्त करत होते.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे आजपासून अनेक व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामध्ये शेतीशी संबंधित विविध व्यवसाय सुरु झाले. शहरातील रस्त्यावरही दररोजच्या तुलनेत आज जास्त गर्दी झाली. मेडिकल आणी दवाखान्याची सेवा पूर्वीप्रमाणे सुरू आहे. शेतीच्या कामाची तीच परिस्थिती आहे. फळे आणि भाजीपाला खरेदी-विक्रीच्या ठिकाणी मात्र, थोडी गर्दी पाहायला मिळाली. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये पाच ऐवजी दहा टक्के कर्मचाऱ्याना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्याप्रमाणे कर्मचाऱ्याची उपस्थिती आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून प्रत्येक ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर रहदारी बंद ठेवण्यात आली आहे.

Last Updated : Apr 20, 2020, 3:27 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details