महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्ण आढळल्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवावे'

खासगी रुग्‍णालयात इतर उपचारासाठी आलेले रुग्णांमध्ये जर कोविड-19 ची लक्षणे आढळली तर अशा रुग्‍णांना तत्काळ शासकीय रुग्‍णालयात रेफर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Private hospitals should send Kovid patients to government hospitals for treatment in nanded
'खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्ण आढळल्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवावे'

By

Published : Jul 31, 2020, 8:25 PM IST

नांदेड -खासगी रुग्‍णालयात इतर उपचारासाठी आलेले रुग्णांमध्ये जर कोविड-19 ची लक्षणे आढळली तर अशा रुग्‍णांना तत्काळ शासकीय रुग्‍णालयात रेफर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या 1 हजार 685 झाली आहे. त्यामुळे कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेले तसेच ज्यांचे 50 वर्षापेक्षा जास्त वय आहे अशा व्यक्ती, ज्यांनी विदेशातून, अथवा इतर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून प्रवास केला आहे अशा सर्व नागरिकांची तपासणी करण्याची मोहिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे.

जिल्हा प्रशासन ट्रेस, टेस्ट व ट्रिट अशा त्रिसुत्रीचा वापर करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. खासगी रुग्णालयामध्ये व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांच्या क्लिनिकमध्ये कोविड-19 ची लक्षणे असलेले रुग्ण उपचारासाठी येत आहेत. ज्या रुग्णांमध्ये कोविड-19 ची प्राथमिक लक्षण आढळतील अशा व्यक्तींना खासगी रुग्णालयांनी तत्काळ पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय किंवा कोविड-19 साठी निर्माण केलेल्या केंद्रावर पाठवणे अपेक्षीत आहे. अनेक ठिकाणी असे होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, कोविड-19 बाधित रुग्णांना वेळेवर उपचार देण्याच्या दृष्टीने संबंधित खासगी डॉक्टरांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details