महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

40 वर्षीय महिलेवर पुजाऱ्याकडून बलात्कार; नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदेड शहरातील गोपाळ चावडी परिसरातील एका देवीची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याने एका विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीविरोधात पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड
नांदेड

By

Published : Oct 11, 2021, 11:28 AM IST

नांदेड - एका ४० वर्षीय विवाहितेवर अनेकदा बळजबरीने बलात्कार केल्याच्या आरोपावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर एका मंदिरातील आरोपी पुजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेचा आंघोळ करतानाचा चोरून काढलेला फोटो समाज माध्यमामधून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप पुजाऱ्यावर आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील गोपाळ चावडी येथील एका ४० वर्षीय विवाहितेसोबत याप्रकरणातील आरोपी तथा तुळजा भवानीनगर , गोपाळचावडी परिसरातील तुळजा भवानी देवीच्या मंदिरातील पुजारी श्रीपाद दिवाकरराव देशपांडे ( रा . हडको, नांदेड ) यांची ओळख झाली. आरोपी श्रीपाद हा सन 2015 मधील मार्च महिन्यात या प्रकरणातील फिर्यादी विवाहितेच्या घरी गेला. त्याचवेळी आरोपी श्रीपाद देशपांडे याने विवाहितेचा स्नान करतानाचा चोरून फोटो काढला. याशिवाय आरोपी श्रीपाद देशपांडे हा एवढ्यावरच थांबला नाही. त्याने तो फोटो फिर्यादी विवाहितेलाच दाखवून समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि विवाहितेसोबत बळजबरीने शरीर संबंध ठेवले. आरोपी श्रीपाद देशपांडे हा मार्च 2015 पासून मी, " तुझा व तुझ्या मुलांचा सांभाळ करतो ". मी तुझ्यासोबत लग्न करतो, मी महाराज आहे तसेच मला तुझ्यासाठी देवाने पाठवले आहे. मी जे म्हणेल त्याप्रमाणे तु वागले पाहिजे, असे म्हणून त्याने फिर्यादी विवाहितेला दबावाखाली ठेवून नेहमीच जीवे मारण्याची धमकी दिली. आपणास दबावाखाली ठेवून आपल्यासोबत वारंवार शरीरसंबंधही प्रस्थापित केले, असा आरोप पीडित विवाहितेने केला आहे. ही माहीती पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

पिडीत महिलेच्या मुलीवरही होती वाईट नजर...!

आरोपीची गेल्या तीन वर्षापासून फिर्यादी महिलेच्या 20 वर्षीय मुलीवर वाईट नजर होती. मुलीच्या मोबाईलवर नेहमी अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवत तसेच तिच्याशी वाईट हेतूने जवळीक साधण्याचा प्रयत्न आरोपीने केल्याने महिलेने तक्रारीत म्हटलं. याप्रकरणी सदर पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात अखेर 10ऑक्टोबर रोजी आरोपी श्रीपाद दिवाकर देशपांडेच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि . विश्वजीत कासले व पो.कॉ. शंकर बिरमवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. एकंदरीतच या घटनेमुळे नांदेडच्या सिडको-हडको परिसरासह जिंदम नगर व अशोक नगर, गोपाळचावडी भागात एकच खळबळ माजली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details