महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मान्सून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात लावली हजेरी, नागरिकांना दिलासा

मान्सून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात सोमवारी जोरदार हजेरी लावली. ४५ डिग्री तापमानाची झळ सोसलेल्या नांदेडकरांना या पावसाने काही अंशी दिलासा मिळाला आहे.

मान्सून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात लावली हजेरी

By

Published : Jun 4, 2019, 9:39 AM IST

Updated : Jun 4, 2019, 10:47 AM IST

नांदेड- मान्सून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात सोमवारी जोरदार हजेरी लावली. ४५ डिग्री तापमानाची झळ सोसलेल्या नांदेडकरांना या पावसाने काही अंशी दिलासा मिळाला आहे.

मान्सून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात लावली हजेरी

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, धर्माबाद, मुखेड आणि नायगाव तालुक्यात सोमवारी पावसाचे आगमन झाले. मृग नक्षत्र लागण्याच्या आधीच पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्य सुखावले आहेत. दुष्काळाने त्रस्त असलेल्या नांदेड जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासाह मान्सून पूर्व पावसाचे वाजत गाजत आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा प्रचंड सुखावला आहे.

Last Updated : Jun 4, 2019, 10:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details