नांदेड- माझा हा चौथा पक्ष आहे, हे सर्वच नेत्यांना ज्ञात आहे. त्याच पातळीवर मला स्वीकारतात. मी ज्या पक्षात जातो, त्या पक्षात निवडून येतो. माझा लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ नसतानाही येथील मतदारांनी मला स्वीकारले. हा विजय माझा नसून मतदारांचा आहे, अशी प्रतिक्रिया नांदेड लोकसभेचे भाजपचे नूतन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मी ज्या पक्षात जातो, त्या ठिकाणी निवडून येतो - प्रताप पाटील चिखलीकर - विधानसभा
नांदेड जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला. त्याच तळमळीने मी जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करेन, अशी प्रतिक्रियाही प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, की देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार आहे. त्यांच्या माध्यमातून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नांदेडचा विकास करण्यासाठी मी बांधील आहे. नांदेड जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला. त्याच तळमळीने मी जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करेन, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. यावेळी भाजप-शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाकेबाजी, गुलाल उधळत व पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी त्यांच्या निवासस्थानासमोरही मोठी गर्दी जमली होती.