नांदेड - गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिबमध्ये बुधवारी (19 ऑगस्ट) श्री गुरु ग्रंथसाहेबांचा प्रथम स्थापना दिवस 'पहला प्रकाश' हा पर्व श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. गुरुद्वाराचे कार्यकारी जत्थेदार संतबाबा रामसिंघजी यांच्या मार्गदर्शनात सर्व धार्मीक विधी संपन्न झाल्या.
यावेळी मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघ, हेडग्रन्थी कश्मीरसिंघ, मौतग्रंथी गुरमीतसिंघ, विजेंदरसिंघ कपूर यांनी विविध सेवांचे संचालन केले. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास श्री आदि गुरुग्रंथसाहेबांच्या हुकुमनामाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर पाठ, किर्तन, आरती, कथा आणि इतर कार्यक्रम पार पडले. पहला प्रकाश पर्वाची अरदास उपरांत प्रसाद वितरण करण्यात आले. पहला प्रकाश पर्व निम्मित गुरुद्वाराच्या लंगरमध्ये लंगर प्रसाद कार्यक्रम झाले. सनानिमित्त भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.