नांदेड - २००८ च्या मुंबई हल्ल्याची चौकशी करणार असल्याचे प्रधानमंत्र्यानी नुकतच जाहीर केल आहे. तसेच यातील दोषींना सोडणार नसल्याचे मोदींनी सांगितले होते. यावर आज वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना काही सवाल विचारले आहेत. इतक्या कडक सुरक्षेत असणारे ताज हॉटेलमध्ये शस्त्रे गेली कशी? ज्या रुम मध्ये दहशतवादी राहिले ते त्या रुम कुणाच्या नावाने होत्या, त्याचा खुलासा सरकारने करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेत त्यांनी शहीद झालेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट जाहीर करावेत. या पाचही जणांना नेमक्या कोणत्या बंदुकीच्या गोळ्या लागल्या होत्या, त्या गोळ्या कुठे तयार झाल्या होत्या, याचा खुलासा सरकारने करावा असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.