नांदेड -सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र जिल्ह्यात मागील सहा वर्षांपासून सुरूच आहे. या काळात नांदेडमध्ये एकूण ९३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2020 मध्ये एकूण ७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सहा वर्षांत प्रथमच शेतकरी आत्महत्यांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
17 वर्षांपासून शेतकरी आत्महत्या
नांदेड जिल्ह्यात मागील सतरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात २०१४ पासून वाढ झाली. सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्ज यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतत चार वर्ष दुष्काळाचा सामना केला. शेतात पीक उगवले नाही, त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. याला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
७७ पैकी ६६ घटना मदतीसाठी पात्र