महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ashok Chavan On Election: महाराष्ट्रातील राजकीय स्थिती काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी अनुकूल - अशोक चव्हाण

प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढविण्याचा व निवडणुकीची पूर्वतयारी करण्याचा अधिकार आहे. आम्हीसुद्धा आमच्या पक्षामध्ये पक्षांतर्गत काम करीत आहोत. सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना व्यक्त केले.

Ashok Chavan On Election
अशोक चव्हाण

By

Published : Jun 10, 2023, 5:14 PM IST

नांदेड : मी नांदेडचा रहिवासी आहे. हा डॉ. शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ असून त्यांच्या काळापासून जिल्ह्याचा विकास होत आहे. हा मतदारसंघ आम्ही काँग्रेसच्या बाजूने राखून ठेवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा महाराष्ट्रात चार ठिकाणी होत आहे. ती नांदेडमध्येही होईल, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

'या' कारणाने वर्षा गायकवाडांची नियुक्ती :काँग्रेसचे नेते भाई जगताप यांना बदलून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया नोंदवली. काँग्रेस पक्षात कोण जवळचा कोण दूरचा हा विषय महत्त्वाचा नाही. निवडणुकीत कोण प्रभावी ठरू शकतो हेच पाहून पक्षाने वर्षा गायकवाड यांची नियुक्ती मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी केली आहे. भाई जगताप यांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वर्षा गायकवाड यांचेही कार्यकर्ते काँग्रेसला मोठे यश मिळवून देतील. तरीसुद्धा मविआच्या जागा वाटपाचा फार्मूला अजून ठरला नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

जागा वाटपाबद्दल चर्चा करू :जागा वाटपाच्या फार्मूल्यापर्यंत आपण अजून पोहोचलो नाही. आम्ही आमच्या पक्षाचा आढावा घेऊन ज्या जागा आमच्यासाठी सक्षम असतील अशा जागांचा आढावा घेतला आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसून मुंबईत चर्चा करतील. ज्या जागा आमच्यासाठी जिंकण्यासारख्या आहेत त्या जागा आमच्याकडे राहाव्या असा आमचा प्रयत्न राहील. मुंबई महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसने 26 व राष्ट्रवादीने 22 जागा लढल्या होत्या; पण आता महाविकास आघाडी असल्याने ज्यांचे प्राबल्य वाढत असेल त्यांना ती जागा दिली जाईल. ज्यांच्याकडे ज्या जागा दिल्या त्या त्यांनी निवडून आणल्या पाहिजेत. आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

तर विजय निश्चित :महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र काम केले तर महाविकास आघाडीचा अनेक जागांवर विजय निश्चित होईल, असा दावा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात मविआच्या नेत्यांना धमक्या येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत यासह अशोक चव्हाण यांनाही धमक्या आल्या आहेत. त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. मात्र, अजूनही काही झालं नाही. महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणाची पातळी घटली असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा:

  1. NCP Anniversary in Delhi: शरद पवारांनी अखेर भाकरी फिरविली, सुप्रिया सुळे यांच्यासह प्रफुल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड
  2. Chandrashekhar Bawankule on Pawar Threat: सौरभ पिंपळकरने शरद पवारांना धमकी दिलीच नाही- बावनकुळे यांचा दावा
  3. Jayant Patil On Ajit Pawar : अजित पवारांवर कोणताही अन्याय नाही; घराणेशाहीला राष्ट्रवादीत थारा नाही - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details