नांदेड -जिल्ह्यातील देगलूर येथे पकडलेल्या गुटख्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडेनासा झाला आहे. हैदराबादमधून 'वजीर' नावाचा वीस लाख रुपये किंमतीचा हा गुटखा आणण्यात आला होता. देगलूर पोलिसांनी हा गुटखा पकडून ट्रकही जप्त केला. मात्र, सातत्याने गुटख्याची तस्करी करणारा यातील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. नेमका या धंद्यामागचा वजीर कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
देगलूरमध्ये पकडलेल्या २० लाखांच्या गुटख्याचा 'वजीर' कोण?
सर्वत्र लॉकडाऊन असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी सुरूच आहे. तेलंगणाच्या सीमेवर असलेला देगलूर मात्र अड्डा झाला आहे. पोलिसांसह प्रशासनाचे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष असून राज्यात गुटखा बंदी असतानाही सर्रासपणे गुटख्याची तस्करी जिल्ह्यात सुरू आहे.
गुटख्याच्या या तस्करीला काही अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे सोनखेड येथे उघडकीस आले होते. त्यातच देगलूरमध्ये गुटख्याच्या या कारवाईत गुन्हा दाखल करताना कायद्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील केला जात आहे. त्यामुळे देगलूर येथील कारवाईवर शंका उपस्थित केली जात आहे.
सर्वत्र लॉकडाऊन असताना जिल्ह्यात मात्र मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी सुरूच आहे. तेलंगणाच्या सीमेवर असलेला देगलूर मात्र अड्डा झाला आहे. पोलिसांसह प्रशासनाचे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष असून राज्यात गुटखा बंदी असतानाही सर्रासपणे गुटख्याची तस्करी जिल्ह्यात सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये इतर जीवनोपयोगी साधनांचा तुटवडा दिसला. पण, गुटख्याची विक्री मात्र सुरूच होती. मोठी आर्थिक उलाढाल आणि प्रशासनाचे दुर्लक्ष त्यामुळे राज्यात गुटखाबंदी असतानाही जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. याला नेमका कोण आळा घालेल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय