महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लॉकडाऊन'च्या काळात भाजप नगरसेवकाच्या फार्महाऊसवर जुगारअड्डा; पोलिसांनी मारला छापा - BJP corporator's farmhouse

उमरी येथील भाजपचे स्वीकृत नगरसेवक बाबू बेग यांच्या फार्महाऊसवर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून नगरसेवकाच्या दोन मुलांसह 18 जणांना ताब्यात घेतले आहे

Gambling house at BJP corporator's farmhouse
भाजप नगरसेवकाच्या फार्महाऊसवर सुरु असलेल्या जुगारअड्ड्यावर पोलिसांचा छापा

By

Published : Apr 6, 2020, 5:44 PM IST

नांदेड - उमरी येथील भाजपचे स्वीकृत नगरसेवक बाबू बेग यांच्या फार्महाऊसवर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून २० जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्व आरोपींवर उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नगरसेवकाच्या फार्महाऊसवर सुरु असलेल्या जुगारअड्ड्यावर पोलिसांचा छापा

हेही वाचा...#कोरोना लॉकडाऊन : आम्ही कधी सुधारणार...?

उमरी येथील भाजपचे नगरसेवक बाबू बेग यांच्या फार्महाऊसवर लॉकडाऊन व संचारबंदी असताना जुगार अड्डा चालू असल्याची माहिती उमरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन नागरसेवक बाबू बेग याचे फार्महाऊस गाठले. तिथे छापा टाकल्यानंतर पोलिसांनी सुमारे १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जुगार अड्डा चालवणाऱ्या नगरसेवक बाबू बेग यांच्या दोन मुलांसह तब्बल 18 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा...Video : अशी ही मदत ! मी आर्थिक मदत करू शकत नाही, पण दोन एकरातील केळी गरजूंना देतो

कोणत्याही दबावाला न जुमानता उमरी पोलसांनी सर्व आरोपींविरुद्ध संचारबंदी लागू असताना आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना आदेशाचे पालन केले नाही म्हणून गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास उमरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details