महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमरीत तोडफोड करणाऱ्या ३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - रूग्णालय

उमरी तालुक्यातील गोरठा गावातील रामा भरकड यांच्या हत्येनंतर संतप्त जमावाने उमरीतील पोलीस वाहने, कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. याप्रकरणी ३१ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी हलगर्जी करणारे बीट जमादार सुदाम कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

उमरीत तोडफोड करणाऱ्या ३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By

Published : Jun 10, 2019, 10:26 AM IST

Updated : Jun 10, 2019, 11:31 AM IST

नांदेड - उमरी तालुक्यातील गोरठा गावातील रामा भरकड यांच्या हत्येनंतर संतप्त जमावाने उमरीतील पोलीस वाहने, कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. याप्रकरणी ३१ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी हलगर्जी करणारे बीट जमादार सुदाम कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

उमरीत तोडफोड करणाऱ्या ३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोरठा गावातील राम भरकड यांची ७ जून रोजी सकाळी किरकोळ वादातून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संतप्त जमावाने उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात धुमाकूळ घातला होता. या घटनेत जमावाने पोलीस जीप (क्रमांक एमएच २६ आर ४३१) ची तोडफोड केली. तर आरसीपी प्लाटूनची मिनी बस (क्रमांक एमएच २६ एन २९६२) जीपच्या काचा जमावाने फोडल्या होत्या. तसेच उपनिरीक्षक सुर्वे यांनी आरोपीला रुग्णालयात आणले असता जमावाने त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले होते. यावेळी उपनिरीक्षक सुर्वे व सहकाऱ्यांनी मध्यस्थी करुन सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही जमावाने दगडफेक, मारहाण करुन दुखापत केली.

या घटनेत उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे व अन्य पोलीस जखमी झाले होते. या प्रकरणाविरोधात उपनिरीक्षक सुर्वे यांनी फिर्याद दिली होती. त्याची गंभीर दखल घेत उमरी पोलीस ठाण्यात दत्ता सावंत, मारुती भरकडे यांच्यासह गोरठा व उमरीतील एकूण ३१ जणांविरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे अधिक तपास करीत आहेत.

Last Updated : Jun 10, 2019, 11:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details