नांदेड :सप्टेंबर महिन्यात एनआयएने देशभरात एकाच दिवशी धाडी टाकून पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना पकडले होते. त्यात परभणीतून चार आणि नांदेडातील दोघांचा समावेश होता. सुरुवातीला दोन वेळेस त्यांना पोलीस कोठडी सुनावली (Police Custody To PFI Accused) होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते तरुंगात होते. पुन्हा एकदा त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राष्ट्रीय देशविघातक तपास कृत्यात असल्याच्या आरोपावरून २२ सप्टेंबर रोजी भिवंडी, बीड, औरंगाबाद, पुणे, नवी मुंबई, नांदेडसह देशभरात अनेक ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली होती. त्यावेळी राज्यभरातून २० जणांना अटक केली होती. त्यात परभणीचे चार आणि नांदेडच्या दोघांचा समावेश होता. सहा आरोपींना सुरुवातीला दोन संस्थेने वेळेस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर ते कारागृहात होते. त्यातच गुरुवारी पीएफआयवर आणखी काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. नांदेडच्या एटीएस अटकेतील सहा आरोपींना पुन्हा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली (PFI Accused from Parbhani and Nanded) आहे.
पीएफआयच्या कार्यकर्त्याला अटक :तपास यंत्रणांनी पीएफआय कार्यकर्त्यांवर छापेमारी केली (PFI Accused arrested) होती. नांदेडमध्येही देगलूर नाका भागातून मेहराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला एनआयएच्या सूचनेवरून एटीएसने अटक केली होती. तसेच एक कार्यकर्ता फरार होता. अखेर सोमवारी नांदेड एटीएसने पीएफआयचा फरार कार्यकर्ता मोहंमद आबेदला याला अटक केली (PFI Accused arrested from Parbhani and Nanded) होती.