नांदेड - शहरातील देगलूरनाका भागात एका गोदामावर छापा टाकून 3 लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. या तिघांविरोधात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये 3 लाखांच्या गुटख्यासह तिघांना अटक - नांदेड गुटखा न्यूज
नांदेड शहरातील देगलूरनाका भागात एका गोदामावर छापा टाकून 3 लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
![नांदेडमध्ये 3 लाखांच्या गुटख्यासह तिघांना अटक Nanded](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7319067-thumbnail-3x2-ned.jpg)
शहरातील जुना मोंढा परिसरातील जर्दा व्यापाऱ्याने देगलूरनाका भागातील गोदामात मोठ्या प्रमाणात राज्यात बंदी असलेला गुटखा ठेवल्याची गुप्त माहिती पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार देगलूरनाका भागातील गोदामावर पोलिसांनी छापा टाकून 3 लाखांचा गुटखा जप्त केला. तसेच मोहमद परवेज मोहमद युनूस, सय्यद अली व मोहमद अझीम मोहमद इकबाल या तिघांनी अटक केली आहे.
सदरील मुद्देमाल अन्न औषध विभागाच्या ताब्यात दिला आहे. ही कारवाई पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाला करावी लागते म्हणजे इतवारा पोलिसांना व स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत माहिती नव्हती का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. लॉकडाऊनच्या काळात देगलूरनाका भागात अनेकदा गुटखा पकडल्याच्या कारवाया विशेष पथकाकडूनच झाल्या आहेत. मात्र, स्थानिक इतवारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना याची खबर राहत नाही का? अशी चर्चा सध्या नांदेड शहरात होत आहे.