महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड शहरात सुमारे ५०० जणांकडून ५५ हजार रुपयांचा दंड वसूल - corona rule violation in nanded

नांदेडमध्ये ६ क्षेत्रीय कार्यालयात ६ पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. कोरोना नियमावलीचे पालन न करणे, तोंडावर मास्क न लावल्याने व दुचाकी वाहनांवर डब्बल सिट असणाऱ्यांवर पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे.

NANDED
नांदेड शहरात सुमारे५०० जणांकडून ५५ हजार रुपयांचा दंड वसूल

By

Published : Jul 11, 2020, 9:42 AM IST

नांदेड - कोरोना नियंत्रण पथकाने मास्क न वापरणाऱ्या ५०० जणांकडून ५५ हजार दंड वसूल केला आहे. महापालिकेच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ६ क्षेत्रीय कार्यालयात ६ पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. कोरोना नियमावलीचे पालन न करणे, तोंडावर मास्क न लावल्याने व दुचाकी वाहनांवर डब्बल सिट असणाऱ्यांवर पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे.

पथक क्र. १ सागंवीने ३६ व्यक्तींकडून हजार ७००, पथक क्र. २ अशोक नगरच्यावतीने ३०२ जणांकडून ३१ हजार २००, पथक क्र. ३ शिवाजीनगर
यांच्यावतीने २६ जणांना ३ हजार ५००, पथक क्र. ४ वजीराबाद यांच्यावतीने (६५) जणांकडून रु. ८ हजार ८५०, पथक क्र. ६ सिडकोने ७५ जणांकडून रु. ८ हजार १०० चा असा एकूण रु.५५ हजार ३५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त विलास भोसीकर, उपआयुक्त अजितपालसिंघ संधू, उपआयुक्त शुभम क्यातमवार, उपआयुक्त सुधिर इंगोले यांच्या नियंत्रणाखाली पथक क्र. १, २, ३, ४, ५, ६ चे सहायक आयुक्त नितीन तोरणेकर, सहायक आयुक्त डॉ. फरतुल्ला बेग, सहायक आयुक्त राजेश चव्हाण, सहायक आयुक्त प्रकाश गच्चे, सहायक आयुक्त रईसोद्दीन सहा. आयुक्त रावण सोनसळे, रईस पाशा यांच्यासह पथकप्रमुख व पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.

आरटीओ कार्यालयाच्या पथकाने आणि शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहराच्या विविध भागात नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.
शहरातील सर्व नागरिकांना कोरोना विषयक नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना वारंवार दिलेल्या आहेत. त्या पालन कराव्यात असे महापालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details