महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमावस्येला होतो पराभव ?; म्हणून यंदा मोदींची सभा होणार गुढीपाडव्याला

२०१४ च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाजप-शिवसेना युतीचे माजी खासदार डी. बी. पाटील यांच्यात लढत होती. राज्यात सर्वत्र शिवसेना-भाजपा युतीने यश मिळविले असताना प्रचंड जाहीर सभा होवून सुध्दा नांदेडच्या जागेवर भाजपाला पराभव पत्करावा लागला होता.

६ एप्रिलला नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

By

Published : Mar 31, 2019, 10:43 AM IST

नांदेड - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक पक्षांचे स्टार प्रचारक देशभर सभा घेत आहेत. नांदेड मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाणांसारख्या तगड्या प्रतिस्पर्धीला पराभूत करण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ६ एप्रिलला नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे.


मागील निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची ३० मार्चला विराट जाहीर सभा श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर झाली होती. या सभेने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले खरे मात्र, त्यावेळी भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता. कारण, त्या दिवशी अमावस्या होती. यामुळेच की काय, भाजपने मोदी यांच्या सभेचा मुहूर्त शोधताना गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त निवडला आहे.


'तमाम नांदेडवासियांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा' या वाक्याने नरेंद्र मोदी यांच्या ३० मार्च २०१४ ची प्रचंड जाहीर सभा सुरु झाली होती. प्रचंड उन्हात ३ तास उशिरा सभा सुरु होवून देखील नांदेडची ही सभा ऐतिहासिक ठरली होती. नरेंद्र मोदी नेमके बोलतात कसे, दिसतात कसे, त्यांची भाषण शैली कशी आहे, याबाबत नांदेडकरांना उत्सुकता होती. २०१४ च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाजप-शिवसेना युतीचे माजी खासदार डी. बी. पाटील यांच्यात लढत होती. राज्यात सर्वत्र शिवसेना-भाजपा युतीने यश मिळविले असताना प्रचंड जाहीर सभा होवून सुध्दा नांदेडच्या जागेवर भाजपाला पराभव पत्करावा लागला होता.


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर सहानुभूती म्हणून त्यांना मतदाराने तारले. त्याच काळात त्यांचे मेव्हुणे भास्करराव पाटील खतगावकर हे २००९ च्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांचे तिकीट काँग्रेसने कापल्याने त्यांनी या लोकसभा निवडणुकीनंतर २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता, हे विशेष. २०१४ च्या नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाचा झालेला पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील जिव्हारी लागला होता. 'इतनी बडी रॅली होकर भी नांदेड मे हम कैसे हारे' असा सवाल त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे प्रताप पाटील चिखलीकर हे निवडणुकीला उभे आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा निवडणुकीत प्रताप चिखलीकर यांची टक्कर अशोक चव्हाण यांच्याशी आहे.


यावेळी गुढीपाडव्याचा सर्वात मोठा मुहूर्त नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी साधण्यात आला असून, ६ एप्रिलला गुढीपाडवा असल्याने या शुभमुहूर्तावर नांदेड येथे होणारी मोदींची सभा भाजप-शिवसेना उमेदवाराला लाभदायक ठरणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. याबाबत भाजप प्रदेश कार्यकारणीची सदस्य चैतन्य देशमुख यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नांदेडला होणारी नरेंद्र मोदी यांची सभा ही महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details