महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात तीन टप्प्यात लसीकरण करण्याचे नियोजन; ११ हजार लाभार्थ्यांच्या माहितीची नोंद...! - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण नांदेड

सध्या जिल्ह्यातील ११ हजार ८१२ लाभार्थ्यांचा डेटा को-व्हिन नावाच्या स्वॉफ्टवेअरमध्ये नोंद करण्यात आला आहे. कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लस प्राप्त झाल्यानंतर मोहीम राबविण्यात येणार आहे.

नांदेड
नांदेड

By

Published : Dec 27, 2020, 10:28 PM IST

नांदेड- जिल्ह्यात तीन टप्प्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील शासकीय व खासगी डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टॉफ, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलीस खाते, तर तिसऱ्या टप्यामध्ये ५० वर्षांवरील व्यक्ती लसीकरणासाठी पात्र राहणार आहेत. या लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा दिल्यानंतर २८ दिवसानंतर लसीची दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.

अकरा हजार लाभार्थ्यांची माहिती नोंदवली

सध्या जिल्ह्यातील ११ हजार ८१२ लाभार्थ्यांचा डेटा को-व्हिन नावाच्या स्वॉफ्टवेअरमध्ये नोंद करण्यात आला आहे. कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लस प्राप्त झाल्यानंतर मोहीम राबविण्यात येणार आहे.

लसीकरण मोहिमेसाठी तालुकास्तरावर गट

लसीकरण मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली व तालुकास्तरावर व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कार्यालय स्तरावर गट स्थापन करण्यात आले असून, बैठकाही घेण्यात आल्या आहेत. मोहिमेची पूर्व तयारीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्पे ठरवून देण्यात आले आहेत.

लसीकरणाच्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी सूक्ष्म कृती नियोजन

त्यानुसार जिल्हा व तालुका स्तरीय कार्यबल गट स्थापण करणे, लसीचा पुरवठा मर्यादित असल्याने, त्यानुसार जिल्हास्तरावर उपलब्ध साधन सामुग्रीचा आढावा घेवुन त्यानुसार नियोजन करणे, लसीकरणासाठी लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम ठरविणे, को-व्हिन नावाच्या स्वॉप्टवेअरमध्ये लाभार्थ्यांचा डेटा अपलोड करणे, लसीकरणाच्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी सुक्ष्म कृती नियोजन तयार करणे, शितसाखळी केंद्राची उपलब्धता व शितसाखळी उपकरणे अद्यावत ठेवणे, लस व साहित्य उपलब्धता ठरवणे, लस टोचण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित शासकीय व खासगी मनुष्यबळाची उपलब्धता ठरविणे, लसीकरणासाठी स्थळ निश्चीत करणे, लसीकरणाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकतेनुसार इतर विभागाचे कर्मचारी यांची सेवा उपलब्ध करुन घेणे यावर काम सुरू आहे.

असा आहे अंमलबजावणीचा टप्पा

संपूर्ण लसीकरण कार्यक्रमाचे संनियंत्रण करण्यास्तव वेळापत्रक ठरविणे, वाहन व्यवस्था , मनुष्यबळ व्यवस्थापन आदी गरजेनुसार उपलब्ध ठेवणे , आरोग्य सेवांच्या नियमित सेवांवर परिणाम होऊ नये याची दक्षता घेणे, प्रशिक्षण व संनियंत्रण कार्यप्रणाली ठरविणे, समाजाचा सर्व घटकांचा समन्वय व सहभाग घेण्यास्तव नियोजन करणे, स्थानिक प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग वाढविणे, कार्यशाळांद्वारे कर्मचाऱ्यांच्या कामाची क्षमता वाढविणे, व्यापक प्रसिध्दीचे नियोजन करणे, आशा व अंगणवाडी सेविका यांचा सहभाग वाढविणे व त्यांना प्रोत्साहनपर भत्ता वेळेवर देणे.

जिल्ह्यात २६५ शितसाखळी उपकरणे

कोविडची लस ठेवण्यासाठीचे तापमान अधिक २ डिग्री ते अधिक ८ डिग्री आवश्यक असल्याने, यासाठी जिल्ह्यामध्ये उपलब्ध आयएलआर डिपफ्रिजर, कोल्ड बॉक्स, व्हॅक्सीन कॅरिअरची सध्याची क्षमता, शिल्लक क्षमता काढण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १०८ कोल्ड चेन पॉईंट आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details