महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अशोक चव्हाण फक्त हायकमांडला पैसे पुरवण्यातच व्यस्त राहिले - पियुष गोयल - BJP

रेल्वेमंत्री पियुष गोयल नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

संपादीत छायाचित्र

By

Published : Apr 15, 2019, 11:51 AM IST

नांदेड - भाजप मला राजकीय दृष्ट्या संपवायला निघाली आहे. माझ्या मतदारसंघासाठी निधी देत नाही, असा आरोप अशोक चव्हाण यांनी नुकताच केला होता. मात्र, अशोक चव्हाण हे केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी देखावा करतात, असा आरोप रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. ते नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील प्रचार सभेत बोलताना पियुष गोयल

ते म्हणाले की, नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे मागील ५ वर्षात कधीही काम घेऊन आपल्याला भेटायला आले नाहीत. मला संसदेतही त्यांचे कधी दर्शन झाले नाही. यावरून त्यांना या भागाच्या विकासाची चिंता नसल्याचे स्पष्ट होते. 'आदर्श' खासदार हे घोटाळे करून हायकमांडला पैसे देण्याच्या नादात सगळा विकास विसरून गेले, असा गंभीर आरोपही गोयल यांनी यावेळी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details