नांदेड -अहमदपूर येथील महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षस सी.टी.चौधरी हे करत आहेत.
नांदेडमध्ये अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार
नांदेडमध्ये महिलेवर अत्याचार करणाऱ्या ३ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहित महिलेचे कलम ४९८ नुसार न्यायालयीन प्रकरण सुरू होते. याच दरम्यान ही महिला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी अहमदपूरहून नांदेड येथे येत होती. यावेळी तिची ओळख जुन्या वर्गमित्राशी झाली. त्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन वर्गमित्राने तिला मित्राच्या घरी नेऊन जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
ही घटना सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या मागील बाजूच्या शासकीय निवासस्थानाच्या परिसरात घडली. यावेळी त्याचे २ मित्र देखील तेथे होते. त्यातील एकाने तुमचा व्हिडिओ काढल्याचे सांगून तो व्हायरल करतो, अशी धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तर दुसऱ्याने ही बाब घरी सांगतो, म्हणून अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने केली. या प्रकरणी २ जणांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांनी दिली.