नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. वारंवार प्रशासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मात्र, काही ठिकाणी लोक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. नांदेड शहरातील पावडे मंगल कार्यालयासमोर सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी सर्व नियम मोडत शेकडो लोक एकत्र आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
'हम नही सुधरेंगे' नांदेडमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा
नांदेड शहरातील पावडे मंगल कार्यालयासमोर सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी सर्व नियम मोडत शेकडो लोक एकत्र आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरातील पूर्णा रोड परिसरात चांदोजी पावडे या मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या मैदानावर जिल्हा प्रशासनाने तात्पुरते भाजीपाला विक्री मार्केटसाठी जागा ठरवून दिली आहे. मात्र, या मैदानात नागरिक व भाजी विक्रेते बेजबाबदारपणे वागत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करत मोठी गर्दी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला असून, अजून याला नागरिक खतपाणी घालत असल्याचे दिसत आहे.
पुर्णा रोडवरील पावडे मंगल कार्यालयासमोरील भाजी मार्केटमध्ये Sसोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होत असल्याचा व्हिडिओ गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ठिकाणी प्रशासनाने लक्ष ठेऊन नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.