महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जलदगती न्यायालयात खटला चालवून 'त्या' आरोपीला फाशी द्या - ग्रामस्थ व नातेवाईक - नांदेड पोलीस बातमी

एका पाच वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना भोकर तालुक्यात घडली होती. यातील आरोपी हा पीडितेच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होता. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी घेत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी किंवा त्याचा एनकाऊंटरमध्ये खात्मा करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 21, 2021, 8:35 PM IST

Updated : Jan 21, 2021, 8:47 PM IST

नांदेड - पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना भोकर तालुक्यात बुधवारी (दि. 20 जाने.) घडली होती. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवून आरोपी बाबू संगेराव (वय 35 वर्षे) यास फाशीची शिक्षा द्यावी किंवा त्याचा एनकाऊटर करावा, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी केली आहे.

बोलाताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक

सालगड्यानेच केला घात

मृत मुलीच्या वडीलाच्या शेतात आरोपी बाबू संगेराव हा गेल्या एक वर्षापासून सालगडी म्हणून कामावर होता. बुधवारी (दि. 20 जाने.) दुपारी पीडित मुलगी आपल्या आई वडिलांसह शेतात आली होती. चार वाजेच्या सुमारास मृत मुलीच्या वडिलांनी मुलीला घरी सोडायला बाबूला पाठवले. पण, मुलीला घरी घेऊन न जाता आरोपीने तिला शेतालगच्या नाल्यात नेले. अंधार पडल्यावर तिच्यावर अत्याचार करून तिचे तोंड दाबून हत्या केली.

आरोपीला विवस्त्र अवस्थेत पकडले

सायंकाळपर्यंतही मुलगी आणि सालगडी घरी न आल्याने मृत मुलीच्या कुटूंबियासह गावकऱ्यांनी शोध सुरू केला. नाल्याजवळ झुडपात मुलीचे कपडे आणि चप्पल आढळली. याच परिसरात शोध घेतला असता मुलीचा विवस्त्र अवस्थेत मुतदेह आढळला. गावकऱ्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा घटनास्थळाजवळच्या झुडपात आरोपीही विवस्त्र अवस्थेत लपून बसलेला आढळला.

हैदराबादप्रमाणे आरोपीचा एनकाऊंटर करण्याची मागणी...!

आरोपी सापडताच गावकऱ्यांनी त्याला मारहाण सुरू केली. त्याचवेळी पोलीस गावात पोहोचले. पोलीसांनी आरोपीला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवून पोलीस ठाण्यात आणले. वेळेत पोलीस पोहोचले नसते तर जमावाने आरोपीला मारून टाकले असते. दरम्यान, या प्रकरणी भोकर पोलिसांनी खून, बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे गावकरी संताप व्यक्त करत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, हैदराबाद पोलिसांप्रमाणे आरोपीचा एनकाऊंटर करण्याची मागणी गावकरी करत आहेत.

हेही वाचा -पंजाबातील तरुणाचा रेल्वे स्टेशनवर आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रयत्नाने वाचले प्राण

Last Updated : Jan 21, 2021, 8:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details