नांदेड - मंगळवारपासून सुरू असलेला पाऊस बुधवारी आणि गुरुवारी दमदारपणे बरसल्याने नांदेडकर सुखावले आहेत. मागील दहा-बारा वर्षानंतर प्रथमच जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली आहे. गेली तीन-चार वर्ष तर नांदेड आणि मराठवाड्याने कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसल्या होत्या. त्यानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे वारंवार अतोनात नुकसान केले होते. यावर्षी वरुणराजा वेळेवर बरसत असल्याने शेतकऱ्यांसह नांदेडकर सुखावले आहेत.
दमदार पावसाने नांदेडकर सुखावले, शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी लगबग - Nanded Rain Update
मंगळवारपासून सुरू असलेला पाऊस बुधवारी आणि गुरुवारी दमदारपणे बरसल्याने नांदेडकर सुखावले आहेत. मागील दहा-बारा वर्षानंतर प्रथमच जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली आहे. शेतीसाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने शहरांमध्ये येत आहेत.
![दमदार पावसाने नांदेडकर सुखावले, शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी लगबग दमदार पावसाने नांदेडकर सुखावले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-09:01-mh-nanded-damdar-pavsane-nandedkar-sukhavalesumedhbansode-12062020071853-1206f-1591926533-893.jpg)
दमदार पावसाने नांदेडकर सुखावले
दमदार पावसाने नांदेडकर सुखावले
नांदेडकरांना यंदा कोरड्या दुष्काळापासून तरी सुटका मिळणार आहे. शहरी भागात कमी पर्जन्यमानामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या ठिकठिकाणी निर्माण झाली होती. पिकांना वेळेवर पाणी नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. मागील तीन दिवसांपासून दररोज पाऊस पडत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी शहर व परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीसाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने शहरांमध्ये येत आहेत.