महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हदगाव हिमायतनगर मतदारसंघ : काँग्रेस, सेनेला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता!

हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर व माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुरूच आहे....तसेच काँग्रेसमध्येही माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांच्यातही उमेदवारीसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे...

हदगाव हिमायतनगर मतदारसंघ

By

Published : Sep 22, 2019, 3:30 PM IST

नांदेड -जिल्ह्यातीलहदगाव-हिमायतनगर मतदारसंघात शिवसेना-काँग्रेसचे सम-समान प्राबल्य असून यावेळी दोन्ही पक्षाला गटातटाने ग्रासले आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर व माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुरूच आहे. तसेच कॉंग्रेसमध्येही माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांच्यातही काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

२०१४ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला होता. शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील यांचा पराभव केला. तरुण तडफदार असलेल्या नागेश पाटील यांनी आमदारकीची सुत्रे घेतली. सुभाष वानखेडे यांच्या नंतर नागेश पाटील हे हदगावचे शिवसेनेचे दुसरे आमदार बनले. मात्र २०१४ साली भाजपमध्ये गेलेले वानखेडे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये पोहोचले. त्यामुळे हदगाव विधानसभेच्या निवडणुकीत आता रंगत येईल असं चित्र आहे.

हदगाव हिमायतनगर मतदारसंघ

हेही वाचा... आमदार शिंदेंचा पत्ता होणार कट? माढ्यात राष्ट्रवादीचा नवा 'शिलेदार' कोण?

हदगाव मतदारसंघात शिवसेनेचा वरचष्मा आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला ५० हजार मतांचे मताधिक्य आहे.पण विद्यमान आमदार नागेश पाटील यांच्या उमेद्वारीला शिवसेनेच्या बाबुराव कदम यांनी विरोध करत स्वत: साठी उमेदवारी मागीतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला गटबाजीचा बसण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार असलेल्या माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधल्या गंगाधर पाटील चाभरेकर यांनी विरोध करत स्व:त उमेदवारी मागीतली आहे. गंगाधर पाटील चाभरेकर हे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खा. राजीव सातव यांचे ते कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे माजी आ. जवळगावकर यांच्या उमेदवारीचा मार्गही खडतर आहे.

तसेच माजी केंद्रीय राज्य मंत्री आणि मुलुख मैदानी तोफ राहीलेल्या सुर्यकांता पाटील व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधवराव पाटील देवसरकर देखील भाजपकडुन उमेदवारी साठी तयार आहेत. तगड्या उमेदवाराच्या शक्यतेमुळे आमदार नागेश पाटील आपला गड कसा राखतात याकडे हदगाव हिमायतनगर तालुक्याच लक्ष लागल आहे.

मुळात अठरा पगड जातीचा भरणा असलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे वंचित आघाडीचा इथ उमेदवार कोण असेल त्यावर निवडणुकीच गांभीर्य अवंलबुन राहणार आहे. तर वंचित आघाडीकडुन इथे बापुराव वाकोडे, किशन पोले, सुदर्शन भारती, मनोज राऊत, बी डी चव्हाण, उत्तम शिंदे, संदीप माने आणि ईश्त्याक अहेमद उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

हेही वाचा... आघाडीचं ठरलं, युतीचं काय...?​​​​​​​

या मतदारसंघात साधारणत: २ लाख ७७ हजार ९०० मतदार आहेत. इथ मराठा, मुस्लीम आणि दलीत मतदार निर्णायक आहे. मात्र मराठा मतदार विभागातल्या गेलेला आहे. या मतदार संघात शिवसेनेकडून विद्यमान आ. नागेश पाटील आष्टीकर, बाबुराव कदम हे दोघेच स्पर्धेत आहेत. तर भाजपा कडुन सुर्यकांता पाटील, माधवराव देवसरकर, पंडीतराव देशमूख यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. काँग्रेसकडून माधवराव जवळगांवकर, गंगाधर चाभरेकर, बाबुराव पाथरडकर, अनिल पाटील बाभळीकर यांच्यासह सुभाष वानखेडे ही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

विद्यमान आमदार म्हणून नागेश पाटील यांची उमेदवारी कायम राहीली तर सेनेचे ईच्छूक बाबुराव कदम नाराज होतील आणि तस झाल तर नागेश पाटील अडचणीत येऊ शकतात. यावर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यशस्वी तोडगा काढतील अशी शिवसैनीकांना आशा आहे. दुसरीकडे काँग्रेसची उमेदवारी गंगाधर चाभरेकर यांना मिळाल्यास माजी आमदार माधवराव पाटील काय भुमीका घेतात यावर चाभरेकर यांचे भवितव्य ठरणार आहे. हदगाव विधानसभेची निवडणूक प्रचंड अटीतटीची होईल यात काही शंका नाही.

हदगाव हिमायतनगरच्या समस्या......!

सध्या या मतदारसंघात रस्त्याची मोठी कामे सुरु आहेत, त्यातच वर्धा नांदेड या रेल्वे मार्गाच कामही प्रगतीवर आहे. त्यामुळे इथले मतदार सरकारच्या कामगिरी वर थोडे बहुत खुष आहेत, रस्ते , रेल्वेच्या सोयीनंतर किमान हा मतदारसंघ विकासाच्या प्रवाहात येईल अशी इथल्या लोकांना आशा आहे. मात्र इथल्या शेतक-यांचे जिवनमान उंचावण्यासाठी काहीही प्रयत्न झालेले नाहीत. यंदा अत्यल्प पावसाने खरीप हंगाम हाथातुन गेल्या सारखी स्थिती आहे. पिकविमा, कर्जमाफीच्या कचाट्यात इथला शेतकरी अडकलेला आहे.

हेही वाचा... कोण राखणार किल्ले 'शिवनेरी'च्या जुन्नर विधानसभेचा गड; चौरंगी लढतीची शक्यता​​​​​​​

विशेष म्हणजे या मतदारसंघातून पैनगंगा, कयाधु अश्या दोन मोठ्या नद्या वाहतात. मात्र सिंचनासाठी इसापुरच्या धरणावरच शेतक-यांना अवंलबुन राहावे लागत. यंदा पावसा अभावी इसापुर धरण भरल नसल्यामुळे आगामी काळात शेतीला पाणी कस द्यायच हा मोठा प्रश्न शेतक-यासमोर आ वासुन उभा राहनार आहे. पर्यायी सिंचन व्यवस्था इथ उभारण्यात राज्यकर्त्याला यश आलेल नाही. उद्योग धंदे तर इथ नावालाही नाहीत. बेकारांची प्रचंड फौज आहे, स्थानीक पातळीवर रोजगार नसल्याने स्थलांतराशिवाय पर्याय नाही. वर्षानुवर्षे हीच मुद्दे निवडणुकीत येतात पण त्याकडे राज्यकर्त्ये गांभीर्याने पाहत नाहीत. उलट इथली विधानसभेची निवडणुक जातीपातीच्या वेगळ्याच मुद्द्यावर भरकटत जाते आणि संपतेही..

आष्ठीकर आणि पवार जवळगावकर या दोन घराण्याने दीर्घकाळ या मतदारसंघाच प्रतीनीधीत्व केल. तुलनेने नागेश पाटील आष्ठीकर यांच्या काळात मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लागली अस मतदार सांगत असतात. त्यामुळे हदगाव हिमायतनगरचे मतदार यावेळेला आमदार म्हणून कुनाला निवडतात याकडे नांदेड जिल्ह्याच लक्ष आहे. प्रचंड चुरशीची अशी लढत इथ होत असते, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वांचीच नजर या मतदारसंघावर कायम असते.

ABOUT THE AUTHOR

...view details