नांदेड: शेतकऱ्यांना बँकांकडून दुय्यम दर्जाची वागणूक थांबता थांबत नाही. जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१ साठी दोन हजार ५३९ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बँकांना दिले होते. परंतु जिल्ह्यात उद्दिष्टांच्या एकूण ५६ टक्केच पीक कर्जवाटप झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांनी दोन्ही हंगामात केवळ ३९ टक्केच पीक कर्जवाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ जिल्हा बँकेने ११९ टक्के व ग्रामिण बँकेने १०५ टक्के पीक कर्जवाटप केले आहे.
नांदेड जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात ५६ टक्केच कर्ज वाटप - नांदेड पीक कर्जवाटप बातमी
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१ साठी दोन हजार ५३९ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बँकांना दिले होते. परंतु जिल्ह्यात उद्दिष्टांच्या एकूण ५६ टक्केच पीक कर्जवाटप झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांनी दोन्ही हंगामात केवळ ३९ टक्केच पीक कर्जवाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे.
असे झाले कर्ज वाटप
राष्ट्रीयकृत बँकांनी आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख एक हजार ५६८ खातेदारांना ७६६ कोटी १२ लाखांचे कर्ज वाटप केले . जिल्हा बँकेकडून ५७ हजार ८४ शेतकऱ्यांना दोन २७७ कोटी ७० लाख , तर महाराष्ट्र ग्रामिण बँकेने ६१ हजार २५४ शेतकऱ्यांना ३८१ कोटी ५१ लाखांचे कर्जवाटप केले . जिल्ह्यात ५६ टक्क्यानुसार आजपर्यंत खरिपासाठी एकूण एक लाख ६४ हजार ३२ ९ शेतकऱ्यांना एक हजार १ ९ कोटी ९ ६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले . रब्बीत ४०५ कोटींचे वाटप रब्बीमध्ये एकूण ५५ हजार ५७७ शेतकऱ्यांना ४०५ कोटी ३७ लाख कर्जवाटप केले . दोन्ही हंगामात ५६.१२ टक्क्यांनुसार दोन लाख १ ९ हजार ९ ०६ शेतकऱ्यांना १४२५ कोटी ३३ लाखांचे कर्जवाटप केले.