महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात केवळ ५ टक्केच पाणीसाठा; याच दिवसात गतवर्षी होता ३५ टक्के पाणीसाठा - नांदेड

जिल्ह्यात पावसाअभावी प्रकल्पातील जलसाठ्यात ३६.९१ दशलक्ष घनमीटरनुसार केवळ ५ टक्के पाणी शिल्लक आहे. आगामी काळात जोरदार पाऊस झाला तरच प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा होईल अन्यथा टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे

नांदेड

By

Published : Jul 28, 2019, 3:21 PM IST

नांदेड - जिल्ह्यात पावसाअभावी प्रकल्पातील जलसाठ्यात ३६.९१ दशलक्ष घनमीटरनुसार केवळ ५ टक्के पाणी शिल्लक आहे. आगामी काळात जोरदार पाऊस झाला तरच प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा होईल अन्यथा टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील वर्षी आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पात २४९.९१ मिलिमीटरनुसार ३४.४९ टक्के पाणीसाठा झाला होता.

नांदेड

जिल्ह्यात यंदा जूनपासून पावसाचा जोर नव्हता. यानंतर जुलैमध्येही पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या १११ प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा झाला नाही. सध्या या प्रकल्पात ३६.९१ दशलक्ष घनमीटरनुसार केवळ ५ टक्के पाणी शिल्लक आहे. परिणामी, नांदेड शहरासह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. मागील वर्षी आजपर्यंत जिल्ह्यात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी होते. यामुळे प्रकल्पात २४९.९१ मिलिमीटरनुसार ३४.४९ टक्के पाणीसाठा झाला होता. मागच्या तुलनेत प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर असल्यामुळे नांदेड शहरात पहिल्यांदाच टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर ग्रामीण भागातही १३१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details