नांदेड - जिल्ह्यातील मुगट (ता. मुदखेड) येथील चार महिला शेतात ज्वारी कापणीचे काम करत होत्या. यावेळी वीज पडून एक महिला जागीच ठार झाली तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. लक्ष्मी वर्षेवार (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे.
मुगट येथे वीज पडून एक महिला ठार तर तीन गंभीर - महिलेचा मृत्यू
मुदखेड येथील चार महिला शेतात ज्वारी कापणीचे काम करत होत्या. यावेळी वीज पडून एक महिला जागीच ठार झाली तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. लक्ष्मी वर्षेवार (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे. तिघींनाही मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून तिन्ही महिलांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
मुदखेड तालुक्यातील मुगट येथे रविवारी सकाळच्या दरम्यान लक्ष्मी वर्षेवार या मुदखेड रेल्वे स्टेशन जवळील आपल्याच शेतात इंदूबाई लोखंडे (वय ४०), रेणुका व्यंकटी वर्षेवार (वय २९), अर्चना दिलीप मेटकर (वय २८) या तिघींना घेऊन ज्वारी कापणीचे काम करत होत्या. त्यावेळी सकाळी अचानकपणे विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. यावेळी महिलांनी लिंबाच्या झाडाखाली आसरा घेतला. मात्र अचानक अंगावर वीज कोसळली. त्यात लक्ष्मी बालाजी वर्षेवार या जागीच ठार झाल्या. तर सोबतच्या तीन महिला गंभीर जखमी झाल्या. तिघींनाही मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून तिन्ही महिलांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.