महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder In Nanded : आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एकाचा खून.. एक गंभीर जखमी - नांदेडमध्ये चाकूने भोसकून खून

काल नांदेड शहरात काढण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ( Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022 ) मिरवणुकीला वादाचे गालबोट लागले आहे. मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या कारणावरून एकजणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला ( Murder In Ambedkar Jayanti Procession ) असून, एक जण गंभीर जखमी झाला ( Murder In Nanded ) आहे.

सचिन थोरात
सचिन थोरात

By

Published : Apr 15, 2022, 5:13 PM IST

नांदेड- नांदेड शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ( Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022 ) आयोजित मिरवणुकीत सिडको परिसरातील बळीरामपुर येथे डीजेच्या तालावर नाचण्याच्या कारणावरून एकाचा भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली ( Murder In Ambedkar Jayanti Procession ) आहे. या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात ( Vishnupuri Govenrment Hospital ) उपचार सुरु आहेत. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. मारेकरी आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनाच्या निर्बंधांनंतर दोन वर्षांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी झाली. याच उत्साहात बळीरामपूर येथे एकाचा खून करण्यात आल्याची घटना ( Murder In Nanded ) घडली. रात्री नाईक महाविद्यालयासमोर ( Naik College Nanded ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला.


चाकूने केले सपासप वार :बळीरामपूर भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाईक कॉलेजसमोर पोहचली. तेथे बळीरामपूर येथील किशोर ठाकूर आणि शेख आदिल असे दोघे मिरवणुकीत इतरांना अडथळे आणत नाचायला लागले. तेव्हा सचिन उर्फ बंटी थोरातने त्या दोघांना मिरवणुकीतून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या किशोर ठाकूरने आपल्या कमरेला असलेला चाकू काढून सचिन थोरातच्या शरिरावर अनेक ठिकाणी सपासप वार केले आणि भोसकले. तसेच सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे यासही चाकू मारून जखमी केले. या चाकू हल्ल्यात सचिन थोरात याचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमेध वाघमारे जखमी झाला आहे. हल्लेखोर किशोर ठाकूर आणि शेख आदिल हे दोघे दुचाकीवरून पसार झाले आहेत.

जखमींवर उपचार सुरु :या घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमी सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे याच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार सुरू आहेत. रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात किशोर ठाकूर आणि शेख आदिविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,३०७,३४ आणि ऍट्रॉसिटी कायदा कलम ३ (२) ( व्हीए ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी ( इतवारा ) डॉ. सिद्धेश्वर भोरे हे करत आहेत.

हेही वाचा : नांदेडात आरोपीचा पोलिसांवर तलवारीने हल्ला; बचावाकरिता पोलीस निरीक्षकांनी झाडली गोळी...!

ABOUT THE AUTHOR

...view details