नांदेड जिल्ह्यात शनिवारी 1 हजार 207 व्यक्ती कोरोना बाधित; 26 जणांचा मृत्यू - नांदेड कोरोना
नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 266 अहवालापैकी 1 हजार 207 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 465 तर अँटिजेन तपासणीद्वारे 742 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
नांदेड -जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 266 अहवालापैकी 1 हजार 207 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 465 तर अँटिजेन तपासणीद्वारे 742 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 46 हजार 483 एवढी झाली असून यातील 34 हजार 649 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 725 रुग्ण उपचार घेत असून 153 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. 31 मार्च ते 2 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 869 एवढी झाली आहे.
जिल्ह्यात 10 हजार 725 बाधितांवर औषधोपचार सुरू -
जिल्ह्यात 10 हजार 725 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 239, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 102, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 200, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 130, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 141, मुखेड कोविड रुग्णालय 266, देगलूर कोविड रुग्णालय 47, नायगाव कोविड केअर सेंटर 94, उमरी कोविड केअर सेंटर 37, माहूर कोविड केअर सेंटर 18, भोकर कोविड केअर सेंटर 23, हदगाव कोविड केअर सेंटर 33, हदगाव कोविड केअर सेंटर 67, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 126, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 33, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 25, बारड कोविड केअर सेंटर 12, मांडवी कोविड केअर सेंटर 3, नांदेड मनपा अंतर्गत विलगीकरण 5 हजार 838, जैनब हॉस्पीटल कोविड केअर सेंटर देगूलर 78, बिलोली कोविड केअर सेंटर 214, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 782 , खाजगी रुग्णालय 962, कंधार काविड केअर सेंटर 37, महसूल कोविड केअर सेंटर 200 असे 10 हजार 725 रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकूण घेतलेले स्वॅब- 3 लाख 28 हजार 268
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 74 हजार 984
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 46 हजार 883
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 34 हजार 649
एकूण मृत्यू संख्या-869
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.54 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-35
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-48
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-407
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 725
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-153.