महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्याला' कोरोना झालाय, त्याच्या दुकानावर जाऊ नका... अफवा पसरवणाऱ्याला अटक - कोरानाबाबत अफवा

आरोपीने व्हॉट्सअ‌ॅपवरील अनेक ग्रुपवर अफवा पसरवली. प्रत्यक्षात यातील अब्दुल चौधरी यांना काहीही झालेले नव्हते. त्यांना या प्रकाराची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी इतवारा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल केली.

Itwara Police Station Nanded
इतवारा पोलीस स्टेशन नांदेड

By

Published : Mar 19, 2020, 12:36 PM IST

नांदेड -शहरात व्यवसायातील स्पर्धेतून प्रतिस्पर्ध्याने एका दुकानदाराला कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवली होती. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. फरदिन खालेद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नांदेडमध्ये कोरोना झाल्याची अफवा पसरवणाऱ्याला अटक...

हेही वाचा...कोरोनाचे देशापुढे संकट; पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार

फरदिन खालेद याने अब्दुल चौधरी या कापड विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवली होती. त्याला कोरोना झाला असून त्याच्या दुकानावर कोणीही जाऊ नये अशी, अफवा त्याने पसरवली. तसेच आरोपीने अफवा पसरवण्यासाठी अब्दुल चौधरी यांचा फोटोही वापरला होता.

आरोपीने व्हॉट्सअ‌ॅपवरील अनेक ग्रुपवर अफवा पसरवली. प्रत्यक्षात यातील अब्दुल चौधरी यांना काहीही झालेले नव्हते. त्यांना या प्रकाराची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी इतवारा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत आरोपी फरदिन खालेद याला अटक केली आहे.

हेही वाचा...'राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर; पुणे, मुंबईसह रत्नागिरीतही आढळला रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details