नांदेड - सिडकोतील जिजामाता कॉलनीत पैशाच्या कारणावरुन एकाला गजाने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संतोष तेलंगे, असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पैशाच्या कारणावरुन नांदेडमध्ये एकाला मारहाण - Crime news
सिडकोतील जिजामाता कॉलनीत पैशाच्या कारणावरुन एकाला गजाने मारहाण केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष तेलंगे आणि चंद्रकांत निकम हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे चंद्रकात निकमने संतोषकडे पंक्चरचे दुकान टाकण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी संतोषने तुझ्याकडे अगोदरचेच पैसे आहेत, आता कसे पैसे देऊ, असे म्हणत पैसे द्यायला नकार दिला. त्यावेळी चिडून चंद्रकांत निकम, पप्पू रावत, सुनीता रावत, सतीश शिंदे यांनी संतोषला शिवीगाळ केली. तसेच संतोषच्या घरातील लोखंडी रॉडने त्याला मारहाण केली.
या प्रकरणी संतोषने दिलेल्या तक्ररीवरून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास एम. के. कवठेकर करत आहेत.