महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण; एकूण संख्या ९८ वर

नांदेडमध्ये आणखी एका पुरुषाला कोरनाची बाधा झाली असून एकूण रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. आत्तापर्यंत 98 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 30 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. औषधोपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Nanded Government Hospital
नांदेड शासकीय रुग्णालय

By

Published : May 19, 2020, 2:47 PM IST

नांदेड -शहरातील करबला भागात एका ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली. या रुग्णावर यात्री निवास एनआरआय भवन येथे उपचार सुरू आहेत. सद्य:स्थितीत रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 आणि 18 मे रोजी पाठवण्यात आलेल्या 182 स्वॅबपैकी 28 रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 98 झाली आहे.

आत्तापर्यंत 98 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 30 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 61 अॅक्टिव रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात, पंजाब भवन कोव्हिड केअर सेंटर व यात्री निवास कोव्हिड केअर सेंटर येथे 49 रुग्ण, बारड ग्रामीण रुग्णालय कोव्हिड केअर सेंटरमध्ये 2 रुग्ण उपचार घेत आहेत. औषधोपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे आत्तापर्यंत एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू पावलेले 5 रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने ग्रस्त होते. असे आजार असलेल्या व्यक्तींनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्या मोबाईलमध्ये 'आरोग्य सेतू अॅप' डाऊनलोड करून घ्यावे, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोनाबाधित रुग्ण असल्यास आपणास सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details