नांदेड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिलासादायक.. 157 नवे पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू - नांदेड कोरोना अपडेट
नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 245 अहवालापैकी 157 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 71 तर अँटिजेन तपासणीद्वारे 86 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 89 हजार 854 एवढी झाली असून यातील 86 हजार 460 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 245 अहवालापैकी 157 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 71 तर अँटिजेन तपासणीद्वारे 86 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 89 हजार 854 एवढी झाली असून यातील 86 हजार 460 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 14 रुग्ण उपचार घेत असून 30 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. 2 जून 2021 रोजी नांदेड येथील 57 वर्षाच्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 1 हजार 890 एवढी आहे.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 123, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 118 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकूण घेतलेले स्वॅब- 5 लाख 46 हजार 672
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 45 हजार 634
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 854
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 86 हजार 460
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 890
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.22 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-66
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-181
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 14
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-30