नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील एका व्यक्तीला शनिवारी अज्ञात वाहनाने धडक दिली, या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात अर्धापूर- नांदेड रस्त्यावर घडला. शुभम संजय तांबे ( वय २३ ) रा. राजुरा, ता. मुर्तीजापूर असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात वाहानाच्या धडकेत एकाचा मृत्यू, अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Nanded District Latest News
जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील एका व्यक्तीला शनिवारी अज्ञात वाहनाने धडक दिली, या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात अर्धापूर- नांदेड रस्त्यावर घडला. शुभम संजय तांबे ( वय २३ ) असे या व्यक्तीचे नाव आहे.
या अपघाताबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शुभम हा भोकरफाटा परिसरातील एका कला केंद्रात ढोलकी वादनाचे काम करतो. शनिवारी रात्री त्याला अर्धापूर- नांदेड रस्त्यावर अज्ञात वाहानाने धडक दिली. या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला. रविवारी त्याचा मृतदेह आढळून आला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाला शनिवारी दुपारी मुलगा झाला होता. मात्र मुलगा झाल्याचा आनंद फारकाळ टिकला नाही. शनिवारी रात्री अपघातामध्ये या तरुणाचे निधन झाले. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. शुभम याच्या पश्चात पत्नी तीन वर्षांची मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.