महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये ट्रक-टेम्पोत भीषण अपघात; एक जागीच ठार, तीन गंभीर जखमी - nanded degloor road accident news

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास देगलूरहुन नांदेडकडे जाणाऱ्या ट्रक आणि नांदेडकडून येणारा आयशर टेम्पोत भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर, तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रक-टेम्पोत भीषण अपघात; एक जागीच ठार, तीन गंभीर जखमी
ट्रक-टेम्पोत भीषण अपघात; एक जागीच ठार, तीन गंभीर जखमी

By

Published : Mar 13, 2020, 7:15 PM IST

नांदेड - नांदेड-देगलूर मार्गावरील केरुर घाटात ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहे.

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्लास्टिक टाक्यांमध्ये द्रवपदार्थ घेऊन जाणारा ट्रक (क्र. एचआर ६१-७५७२) देगलूरहुन नांदेडकडे येत होता. दरम्यान, केरुर घाटाच्या वळणावर नांदेडकडून देगलूरकडे भरधाव वेगाने संत्री घेऊन जाणारा आयशर टेम्पो (क्र. केए ०७ बी-११४७) हा ट्रकवर आदळला. हा अपघात एवढा जबर होता की, त्यात ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला. केबिनमध्ये झोपलेला सहचालक जयवीर रिसवाल जाट (वय ५५) रा. सांडवा, ता. तोसाम जिल्हा भिवानी हरियाना याची मान दरवाजा आणि ट्रकच्या मागील भागात अडकल्यामुळे तो जागीच ठार झाला. तर, ट्रकचालक धर्मवीर जयसिंग (हरियाणा) याच्या पोटावर स्टेरिंगचा जोरदार दाब बसला, त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली निकामी झाले.

हेही वाचा -मनोरुग्ण तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ शिंदे, पोउपनी घाडगे, पोलिस नायक श्रीरामे, पोलीस कर्मचारी आडे, भोळे व बिजूर येथील नागरिक श्याम गायकवाड, देविदास सूर्यवंशी, मोहन श्रीरामे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ट्रक, टेम्पोतून बाहेर काढून रुग्णालयात पाठवले.

हेही वाचा -कोरोना संशयिताला नांदेड शासकीय रुग्णालयातून हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात हलवले

ABOUT THE AUTHOR

...view details