महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चालकाचा ताबा सुटल्याने वर्‍हाडाचा टेम्पो उलटला; एकाचा मृत्यू, 36 जण जखमी - नांदेड जिल्हा लेटेस्ट न्यूज

मुखेड तालुक्यातील सलगरा (बु.) जवळील राज्यमहामार्गावरील इंद भारत उर्जा कंपनी जवळ चालकाचा ताबा सुटल्याने वर्‍हाडाचा टेम्पो उलटला. यात एक तरुण ठार तर 36 जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. प्रशांत जनार्दन सुर्यवंशी (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे.

चालकाचा ताबा सुटल्याने वर्‍हाडाचा टेम्पो उलटला
चालकाचा ताबा सुटल्याने वर्‍हाडाचा टेम्पो उलटला

By

Published : Jun 15, 2021, 9:49 PM IST

नांदेड -मुखेड तालुक्यातील सलगरा (बु.) जवळील राज्यमहामार्गावरील इंद भारत उर्जा कंपनी जवळ चालकाचा ताबा सुटल्याने वर्‍हाडाचा टेम्पो उलटला. यात एक तरुण ठार तर 36 जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. प्रशांत जनार्दन सुर्यवंशी (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे. जखमींमध्ये एक 9 वर्षांची मुलगी, 29 महिला तर 6 पुरुषांचा समावेश आहे. प्रथमोपचार करून यातील 22 जणांना उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले आहे.

चालकाचा ताबा सुटल्याने वर्‍हाडाचा टेम्पो उलटला

वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात

लातूर जिल्ह्यातील मौजे हाळी (ता.उदगीर) येथून 40 ते 45 जणांचे वऱ्हाड घेऊन वाहन क्रमांक (एम.एच. 04 ई. बी. 3525) हा टेम्पो बिलोली तालुक्यातील कार्ला येथे येणार होता. मात्र रस्त्यातच मुखेड तालुक्यातील सलगरा (बु.) जवळील राज्यमहामार्गावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. या अपघातामध्ये एक जण ठार तर, 36 जण जखमी झाले आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सलगरा बु. आणि खरब खंडगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, व जखमींना रुग्णवाहिकेतून मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा -मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावाने चंदा हाच संघ परिवार अन् भाजपाचा धंदा - सचिन सावंत

ABOUT THE AUTHOR

...view details