नांदेड - चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाने घाला घातला. लिबगावजवळ झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली. हे दोन्ही भाऊ पूर्णा तालुक्यातील कमळापूर येथील रहिवासी आहेत.
चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू - सख्या भावांचा रक्षाबंधनाच्या दिवशीच अपघातात मृत्यू
कमळापूर येथील संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे दोघे दुचाकीवरून आपल्या चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी मुदखेडला निघाले होते. लिंबगाव पाटीजवळ येताच एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, कमळापूर येथील संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे दोघे दुचाकीवरून आपल्या चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी मुदखेडला निघाले होते. लिंबगाव पाटीजवळ येताच एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
दोघांवरही लिबगाव रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत असून, घटनास्थळावरून पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केल्याचे लिबगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश शेळके यांनी सांगितले. ऐन रक्षाबंधनादिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.