नांदेड -ओबीसी समन्वय समिती नांदेडच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी नांदेड लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढत विविध मागण्यांसाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
नांदेडमध्ये खासदारांच्या घरावर मोर्चा काढत ओबीसीचे ढोल बजाव आंदोलन - Nanded news in marathi
आज विविध मागण्यांसाठी नांदेड लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढत विविध मागण्यांसाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
ओबीसी आंदोलन
'ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी'
ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारसी लागू करण्यात याव्यात, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात डेटा सादर करावा, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी यासह अनेक मागण्याचे निवेदन खासदारांच्या निवासस्थानी भेटून देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष नामदेव आईलवाड यांनी यावेळी दिला.
Last Updated : Aug 15, 2021, 4:55 PM IST