महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या आकड्याची नोंद होणे गरजेचे - देवेंद्र फडणवीस - live marathi news

कोरोना काळात झालेल्या मृत्यूची नोंद योग्य प्रकारे झाली पाहिजे, जेणेकरून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यास त्याचा फायदा होईल असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Jun 2, 2021, 9:02 PM IST

नांदेड- कोरोना काळात झालेल्या मृत्यूची नोंद योग्य प्रकारे झाली पाहिजे, जेणेकरून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यास त्याचा फायदा होईल असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते नांदेडात आले होते. यावेळी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट देत आढावा घेतला.

'राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या आकड्याची नोंद होणे गरजेचे'

'कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूची नोंद झाली पाहिजे'
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहे. मात्र त्याची नोंद प्रशासनाला करता आली नाही. त्यासाठी पुन्हा एकदा ही नोंद करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना देखील फडणवीस यांनी दिल्या. यावेळी अधिष्ठाता दिलीप म्हैसेकर, सीईओ वर्षा ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची उपस्थिती होती.

वैद्यकीय महाविद्यालयाची केली पाहणी
देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडला भेट दिली. यावेळी वैद्यकीय सेवा आणि सुविधेचा आढावा फडणवीस यांनी घेतला. पीएम केअर फंडातून रुग्णालय परिसरात ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आले आहेत. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. बैठक देखील पार यावेळी पडली. अधिष्टाता दिलीप म्हैसेकर, जी.प च्या कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची उपस्थिती होती.

'आदिवासी भागात जनजागृती झाली पाहिजे'
कोरोना महामारीत लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. अनेक गावांत लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी प्रशासनाने जनजागृती केली पाहिजे. जेणेकरून लसीकरणाबाबत लोकांच्या मनातील भीती कमी झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त लसीकरण झाले पाहिजे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -राज्यात 'हागणदारीमुक्त' नंतर आता होणार 'कोरोनामुक्त' गाव स्पर्धा, ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details