नांदेड - जागतिक कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे यंदा लग्न समारंभाची धाम-धूमच थांबली आहे. मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ पुढे ढकलले आहेत. तर काही लग्न केवळ चार ते पाच कुटुंबीयांच्या उपस्थितीत होत आहेत. त्यामुळे लग्नात बँड-बाजा-बारातही नाही. पण बँड वाजविणाऱ्या वाजंत्र्यावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.
यंदा 'नो' बँड-बाजा-बारात; व्यावसायिकावर उपासमारीची वेळ.....! - Band workers facing loss during lock down
कोरोनाचा फटका बँड वाजवणाऱ्या कलाकारांनादेखील बसला आहे. ऐन लग्न सराईत कोरोनाच भीषण संकट उभा ठाकलं आहे. शहरात काम करण्यासाठी आलेल्या बँडवाल्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचेवेळ आली असल्याचे या कलाकारांनी सांगितले.

कोरोनाचा फटका बँड वाजवणाऱ्या कलाकारांनादेखील बसला आहे. ऐन लग्न सराईत कोरोनाच भीषण संकट उभा टाकल आहे. वर्षभरातील १२ महिन्यांपैकी ४ महिने बँडवाल्याचा हंगाम असतो. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल नंतर गावागावात साजरी केली जाते. लग्न समारंभ आणि भीम जयंतीला बँडवाल्याना विविध सार्वजनिक कार्यक्रम मिळत असतात.
या चार महिन्यात बँड वाजून कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसा जमा केला जातो. लग्न सराईत या बँड पथकातील १ व्यक्ती जवळपास ३० ते ३५ हजार रुपय कमावतो. या ३० ते ३५ हजारात वर्षभर कुटूंबाचा गाडा चालवावा लागतो. पण यंदा कोरोनामुळे सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत. या बँड वाजवणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरोडानाका परिसरातील तिरुपती बँड पार्टी मध्ये २० कलाकार काम करतात. या पथकातील अनेक जण जिल्ह्यातील विविध गावातून आलेले आहेत. यातील कलाकार नांदेड शहरात भाड्याच्या घरात राहतात. सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने जगावं कसे असा प्रश्न या कालाकारांसमोर निर्माण झाला आहे. शासनाने आणि दानशूर नांगरीकांनी मदत करण्याचे आवाहन या बँड वाजवणाऱ्या कलाकारांनी केले आहे.