महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड कोरोना अपडेट : बुधवार दिलासादायक... सात रुग्ण बरे, कोरोनाचा नवीन रुग्ण नाही..!

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करावे. जेणेकरून, आपल्या सभोवती कोरोनाबाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करते, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

nanded corona update
नांदेड कोरोना अपडेट

By

Published : May 28, 2020, 9:14 AM IST

नांदेड - कोरोना विषाणूसंदर्भात बुधवारी (ता. 27) सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण 149 अहवालापैकी 144 निगेटीव्ह अहवाल आले. यातील एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 137 एवढी आहे. बुधवार एनआरआय भवन आणि यात्री निवास कोविड सेंटर येथील 7 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सात दिवसानंतर नांदेडसाठी दिलासादायक चित्र आहे.

आतापर्यंत 137 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 86 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर, उर्वरित 44 रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. त्यातील दोन महिला (वय-52 व 55 वर्षे ) रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 27 मेपर्यंतच्या कोरोना संशयित व कोविड रुग्णांची संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण - 1 लाख 36 हजार 132

घेतलेले स्वॅब - 3 हजार 502

निगेटिव्ह अहवाल - 3 हजार 85

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 137

नाकारण्यात आलेले नमुने – 14

मृत्यू संख्या - 7

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 86

सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - 44

स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या - 122

मंगळवारी (26 मे) 122 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर, बुधवारी 27 मे रोजी 42 रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यांचे अहवाल आज (गुरुवार) संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील.

एकूण 137 रुग्णांपैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. 86 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 44 रुग्णांपैकी 8 रुग्ण डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, पंजाब भवन कोव्हिड केअर सेंटर, यात्री निवास कोव्हिड केअर सेंटर येथे 21 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे रुग्णालयात आहेत. सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनास सहकार्य करावे. तसेच, सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करून घ्यावे. जेणेकरून, आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

जिल्हा कोरोना विषाणू संसर्गाबाबत बुधवारी (27 मे) सायंकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी

• आत्तापर्यंत एकूण संशयित – 3 हजार 511,
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या -3 हजार 197,
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 1 हजार 682,
• अजून निरीक्षणाखाली असलेले – 221,
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 45
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3 हजार 152,
• आज घेतलेले नमुने – 42,
• एकूण नमुने तपासणी- 3 हजार 502,
• एकूण पॉझिटीव्ह रुग्ण- 137,
• पैकी निगेटीव्ह – 3 हजार 85,
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 122,
• नाकारण्यात आलेले नमुने – 14,
• अनिर्णित अहवाल – 140,
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले – 86,
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 7,
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 36 हजार 132. या सर्वांना घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details